कोणीही घाबरून जाऊ नये मीरा-भाईंदर शहरात सर्व जीवनावश्यक सेवा सुरू – आयुक्त डांगे…

शहरात आतापर्यंत एक ही कोरोनाबाधित रुग्ण नाही तरीही
देशात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. देशातील परिस्थिती वेगळ्या वळणावर जात आहे. चिंताजनक वातावरण आहे.त्याच धर्तीवर देशात १४एप्रिल पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. तरी जनतेनी घाबरून जाऊ नये जीवन आवश्यक सेवा सुरू राहतील काळजी घ्या, घरीच निवात रहा आणि तुमच्या सेवेसाठी कार्येरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असे आवाहन केले आहे।

मिरा- भायंदर म न पा.आयुक्त चंद्रकांत डांगे, यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जरी दि. १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलेली असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व जीवनावश्यक वस्तू उदा. किराणा, भाजीपाला, औषधी, दूध, बेकरी,पेट्रोल, डिझेल, बॅन्क, ATM इ. च्या आस्थापना नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार आहेत.

नागरिकांनी या दुकानांवर गर्दी करू नये. वस्तू घेताना कृपया रांग लावून व १ मीटर अंतर ठेऊनच घ्याव्यात. कारण ‘कोरोना’ व्हायरसचा प्रसार संपर्कातूनच होतो. आपणास कोणासही ज्ञात नसेते किंवा गर्दीमधील कोणती व्यक्ती कोरोनाबाधित आहे ते ओळखता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी संपर्क हा अंतर ठेवून साधावा(social distancing ) जेणेकरून या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी मदत होईल।

नागरिकांच्या सोयीसाठी मनपातर्फे भाजीपाला शहरातील नागरिकांना मिळावा म्हणून काही नवीन तात्पुरते भाजीपाला मार्केट तयार करण्यात येणार आहेत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला पुरविण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी panic होऊ नये. शिस्तीने आवश्यक वस्तूंची खरेदी करावी. अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. विनाकारण घराबाहेर पडू नये।

मीरा-भाईंदर मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे की शहरातील अलगीकरन कक्षातून ( Home Quarantine ) ठेवलेल्या व्यक्तीना या कक्षा मधून मुक्त करण्यात येणा-या व्यक्तिंची संख्या वाढत आहे. जनतेचे सहकार्य लाभत आहे. आता पर्यंत शहरात वातावरण चांगले आहे।

मीरा-भाईंदर शहरामध्ये मध्ये आजपर्यंत कोरोनाबाधित एकही रूग्ण सापडलेला नाही. पण यापुढे रूग्ण आढळणारच नाही, असं निश्चितपणे सांगता येणार नाही. ते टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्यतो घरीच रहावे. रस्त्यावर व दुकानात विनाकारण गर्दी करणे टाळावे।

मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शहरातल्या प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या प्रयत्नात आहेत. नागरिकांनी कृपया प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे।

Spread the love

Written by 

Related Posts

Leave a Comment

9 − 4 =

WhatsApp chat